Friday 19 April 2019

Sometimes Anger Becomes Enemy Of Correct Understanding...

स्वाभाविकता 



        आज वरद पाच वर्षांचा झाला. वरदच्या बर्थडेचा प्लँनिंग वरदची मम्मी गौरी ने ऑफिस मधेच एक्सेल शीट वर प्रीप्लान केला होता. गौरी IT कंपनी मधे काम  करते . आठ तासाचं काम आणि दोन तास ट्रॅव्हलिंग . 
वरद चा संगोपन यशदा मावशी करतात.आजही गौरीची नेहमी प्रमाणे कामाला  जायची गडबड . 

आज सकाळी सकाळीच गौरीने वरदचा फोटो लॉइड्स ऑफ लव्ह च्या स्टेटस सह सोशल  मीडिया वर अपलोड केला. झोपलेल्या वरदच्या गालावरून हाथ फिरवून गौरी यशदा मावशींकडून टिफिन घेऊन ऑफिस साठी निघते . दुपारी ऑफिस मध्ये कामांत असणारी गौरी यशदा मावशींना घरात ठेवलेल्या छोट्या हँडसेट वर कॉल करते आणि रात्रीच्या बर्थडेच्या डिन्नरसाठी बुक केलेल्या साधारण घरापासून १ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या हॉटेलचा ऍड्रेस  सांगते . 
मुलीप्रमाणे मानणाऱ्या यशदा मावशी गौरीने सांगितल्या प्रमाणे वरदला छान  नवे कपडे घालून तयार करतात. मस्तीखोर, खोडकर वरद घरातून निघताना मावशींकडे  कडेवर उचलून घेण्याचा हट्ट करतो . वरदचा हट्टावरून  हट्ट पुरवणाऱ्या यशदा मावशी वरदला कडेवर घेऊन रीक्षा स्टॅन्ड पर्यंत येतात. रिक्षाने गौरीने सांगितलेल्या हॉटेलच्या पत्त्यावर यशदा मावशी वरदला घेऊन उतरतात. एका हाताने वरदचा हाथ पकडून एका हाथाने रिक्षाचे पैसे यशदा मावशी हॉटेलच्या बाहेर थांबलेल्या चालकाला देत असतात.
हॉटेलच्या गेटवर पोहचताच वरद हाताला धरलेल्या मावशींच्या हाथाला झटका देऊन हॉटेलच्या आवारात उजव्या साईडला असणाऱ्या घसरकूंडी, झोक्याकडे पळाला . आधीच हॉटेल मध्ये पोहोचलेली गौरी देखील अजून कसे वरद आणि मावशी आले नाहीत हे पाहण्यासाठी बाहेर येते आणि तिचा लक्ष वरदकडे जात. मस्तीखोर वरद पळत जाऊन आधीच झोक्यावर बसलेल्या साधारण त्याच वयाच्या असणाऱ्या मुलाला ढकलत होता, शेजारी असणाऱ्या मुलाने वरदची केस ओढली .
 वरदचा हुंदका पडताच गौरी चा लक्ष घडणाऱ्या प्रसंगावर पडल. गोष्ट साधारण यशदा मावशी तिथंपर्यंत पोहोचे पर्यंतची होती. त्याच वेळात .............


गौरी:    अहो यशदा मावशी नीट लक्ष देता येत नाही का तुम्हाला?  किती हा निष्काळजी पणा तुमचा...  (क्षणभर येणाऱ्या चिडखोरीतल्या रागात एकवटलेला उच्च स्वरातील आवाजात होता तो...)



खरंतर घडणाऱ्या गोष्टी स्वाभाविक होत्या .गौरीच ओरडणं पण त्या क्षणाला स्वाभाविक होत कारण कोणत्या मातेला आवडेन आपलं मूल दुखावलेल?
   
आणि नातवा प्रमाणे संगोपन करणाऱ्या यशदा मावशींना देखील कुठे आवडणारी होती हि गोष्ट?

पण स्वाभाविक गोष्टीला मुकलेली यशदा मावशी गौरीच्या रागिष्ट आवाजाला दचकून आतल्या आत घुटमटून गेली होती . समजूतदार असणाऱ्या गौरीने देखील जास्त काही फाफट पसारा आपल्या रागाचा  न होऊन देता,चढलेल्या रागाचा  पारा उतरवत वरदला कडेवर घेऊन निकामी भाव चेहऱ्यावर, कसलाही प्रतिसाद न देता यशदा मावशींकडे बघत हॉटेलच्या आत निघून गेली.
                .
                .
                .

वरदच हाथ सोडून आकर्षित करणाऱ्या गोष्टींकडे धाव घेणं , खोडकर पणाच्या  वृत्तीमुळे सामान वयाच्या लहान मुलांचा आपापसातील भांडण होणं, यशदा मावशींकडून वरदने दिलेल्या झटक्यामुळे  वरदचा हाथ आपल्या एका हाथातून सुटणं , घड्याळाच्या काट्यांवर चालणाऱ्या गौरीचा प्रिप्लान केलेला बर्थडे  ठरवलेल्या प्लॅन अनुसार करण, उशीर होत होता म्हणून गौरीच बाहेर येणं आणि तिच वरदकडे लक्ष जाण, सारं काही स्वाभाविक होत, वेगळा अस काहीच नव्हत.......

पण,

फरक तिला पडला होता, जिची चूक नसतानाही स्वाभाविक गोष्टींवर ,

गौरीचा रागाने एकवटलेला  उच्च स्वरातील आवाज हा यशदा मावशींनी कमावलेल्या प्रेमाचा ,विश्वासाचा, आणि इज्जतीचा निशब्द उदार मायेचा अपमान होता .













2 comments: