असह्य उन्हात सुखवणारी मंद वाऱ्याची झुळूक
पायल, गरीब कुटुंबातील पण मनाने स्थिर आणि खंबीर, शांत स्वभावाची मुलगी. लहानपणा पासूनच अभ्यासात हुशार, खेळण्या बागडन्याच्या वयात गरिबीच्या बोजाखाली दडलेल्या कुटुंबाला छोटासा हाथभार म्हणून कष्टात लहानपण घालवलेली सोज्वळ अशी मुलगी.
घरी गरिबीची परिस्थिती. वडील मोलमजुरी करून संसाराचा गाडा पुढे नेत. हाथावरचा पोट... शेतात मोलमजुरी करणे आणि आपला उदरनिर्वाह करणे असा दिवसा मागून दिवस ढकलन्याचा एकमेव मार्ग जणू गरिबीच पाचविला पुजलेली. सावकाराच कर्ज माथ्यावर, घरात वीज नाही ना पोटभर खायला पुरेसं अन्न. असा हा संसाराचा गाडा एकटाच ओढणारा पायल चा बाप तुकोबा.
आयुष्यभर शंभर रुपये मोलमजुरी वर घर चालवणारा तुकोबा आज जास्त चिंतेत दिसत होता. थकलेल शरीर,थरथरनारे हाथ पण डोळ्यामध्ये असणारी एक आस जणू त्याच्या प्रत्येक श्वासाचा पुरावा होती.
तुकोबा ची मुलगी आज पदवीधर होणार आहे. तुकोबा ने आज पहाटेलाच लवकर उठून विहिरीतून काढलेल्या पाण्याने देवाचे नामस्मरण करत अंघोळ केली. बायकोच्या हाथची पिठलं भाकरी बाहेर वाळत टाकलेल्या पांढऱ्या हाथरुमाला मध्ये बांधून घेऊन आपल्या बायकोचा हाथ हातात घेऊन म्हणला, "आज आपली लेक पदवीधर होणार आहे, खूप कष्टाने वाढवली पोर माझी"...(चेहऱ्यावर अभिमान आणि सुखाची चाहूल झळकत होती.)
तिच्या साठी गोडाचा शिरा कर .आज सावकाराला पैशाची विनंती करून पाहतो.
गरिबीने बालपण हिरावून घेतला माझ्या लेकीचा. अंधाऱ्या खोलीत डोळे तारवटून मेणबत्ती च्या प्रकाशाखाली अभ्यास केलाय माझ्या पायल ने...(एकदम दबक्या आवाजात, डोळ्यात असावे दाटवून येतात आणि तुकोबा शेताची वाट धरतो.) माथ्यावर असलेल्या उन्हात, पायाला चटके बसणाऱ्या काळ्या मातीत काम करणाऱ्या तुकोबाच्या माथ्यावरुन घरंगळत येणारे कष्टाच्या घामाचे ओघळ फक्त आणि फक्त एकाच आशेसाठी आतुरले होते...
तुकोबाला आपल्या पोरीला शिकवण्याचा ध्यास हा गरिबीला कमजोरी मानून शेतकऱ्याच रक्त पिळनाऱ्या सावकारा पासूनच्या बचावासाठी होता. अडाणीपणा हा पिळवनुकिच कारण बनला आणि गरिबी पाचवीला पूजली गेली. आयुष्य जगण्या लायक न राहता गुलाम गिरी लायक होऊन गेलं होत .विचारांचे भडीमार डोक्यामध्ये चालू असताना त्याच शेताच्या ठेकेदाराचा तुकोबाला आवाज ऐकू येतो...
ए तुकोबा..........
अरे ए तुकोबा......
तुझ्या साठी फोन आलाय बघ तुझ्या पोरीचा. हाथी असलेला फावडा तसाच टाकून गळ्यात असणारे मळकट फडक चेहऱ्यावर फिरवत उन्हामध्ये तापलेल्या चटके बसणाऱ्या काळ्या मातीत मोठी मोठी पाऊले टाकत शेड खाली बसलेल्या ठेकेदाराकडून फोन तुकोबा घेतो, आणि तुकोबाचे आतुरलेले कान शब्द ऐकतात ...
बाबा, मी पदवीधर झाले. मी पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले...
थरथरता हाथ, पाणवलेल्या डोळ्याच्या कडा, सुन्न पडलेल्या डोक्यात सगळं काही थांबलं होत...
तो क्षण जणू तुकोबा साठी,
मंद वाऱ्याची झुळूक होती जी जणू असह्य उन्हाला देखील सुखवून टाकणारी होती.....
|
Wow..looks like writer became serious thinker... Good to read such blogs... Keep it up Amruta
ReplyDeleteThank you :)
ReplyDeleteGreat start, Wish you good luck for amazing content !
ReplyDeleteThank you:)
ReplyDeleteअप्रतिम अमृता।
ReplyDeleteगरिबी,गुलामगिरी,दारिद्र्य, वर एकाच प्रहार ते म्हणजे "शिक्षण"
Thank you.
ReplyDeleteRight