Friday, 19 April 2019

Sometimes Anger Becomes Enemy Of Correct Understanding...

स्वाभाविकता 



        आज वरद पाच वर्षांचा झाला. वरदच्या बर्थडेचा प्लँनिंग वरदची मम्मी गौरी ने ऑफिस मधेच एक्सेल शीट वर प्रीप्लान केला होता. गौरी IT कंपनी मधे काम  करते . आठ तासाचं काम आणि दोन तास ट्रॅव्हलिंग . 
वरद चा संगोपन यशदा मावशी करतात.आजही गौरीची नेहमी प्रमाणे कामाला  जायची गडबड . 

आज सकाळी सकाळीच गौरीने वरदचा फोटो लॉइड्स ऑफ लव्ह च्या स्टेटस सह सोशल  मीडिया वर अपलोड केला. झोपलेल्या वरदच्या गालावरून हाथ फिरवून गौरी यशदा मावशींकडून टिफिन घेऊन ऑफिस साठी निघते . दुपारी ऑफिस मध्ये कामांत असणारी गौरी यशदा मावशींना घरात ठेवलेल्या छोट्या हँडसेट वर कॉल करते आणि रात्रीच्या बर्थडेच्या डिन्नरसाठी बुक केलेल्या साधारण घरापासून १ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या हॉटेलचा ऍड्रेस  सांगते . 
मुलीप्रमाणे मानणाऱ्या यशदा मावशी गौरीने सांगितल्या प्रमाणे वरदला छान  नवे कपडे घालून तयार करतात. मस्तीखोर, खोडकर वरद घरातून निघताना मावशींकडे  कडेवर उचलून घेण्याचा हट्ट करतो . वरदचा हट्टावरून  हट्ट पुरवणाऱ्या यशदा मावशी वरदला कडेवर घेऊन रीक्षा स्टॅन्ड पर्यंत येतात. रिक्षाने गौरीने सांगितलेल्या हॉटेलच्या पत्त्यावर यशदा मावशी वरदला घेऊन उतरतात. एका हाताने वरदचा हाथ पकडून एका हाथाने रिक्षाचे पैसे यशदा मावशी हॉटेलच्या बाहेर थांबलेल्या चालकाला देत असतात.
हॉटेलच्या गेटवर पोहचताच वरद हाताला धरलेल्या मावशींच्या हाथाला झटका देऊन हॉटेलच्या आवारात उजव्या साईडला असणाऱ्या घसरकूंडी, झोक्याकडे पळाला . आधीच हॉटेल मध्ये पोहोचलेली गौरी देखील अजून कसे वरद आणि मावशी आले नाहीत हे पाहण्यासाठी बाहेर येते आणि तिचा लक्ष वरदकडे जात. मस्तीखोर वरद पळत जाऊन आधीच झोक्यावर बसलेल्या साधारण त्याच वयाच्या असणाऱ्या मुलाला ढकलत होता, शेजारी असणाऱ्या मुलाने वरदची केस ओढली .
 वरदचा हुंदका पडताच गौरी चा लक्ष घडणाऱ्या प्रसंगावर पडल. गोष्ट साधारण यशदा मावशी तिथंपर्यंत पोहोचे पर्यंतची होती. त्याच वेळात .............


गौरी:    अहो यशदा मावशी नीट लक्ष देता येत नाही का तुम्हाला?  किती हा निष्काळजी पणा तुमचा...  (क्षणभर येणाऱ्या चिडखोरीतल्या रागात एकवटलेला उच्च स्वरातील आवाजात होता तो...)



खरंतर घडणाऱ्या गोष्टी स्वाभाविक होत्या .गौरीच ओरडणं पण त्या क्षणाला स्वाभाविक होत कारण कोणत्या मातेला आवडेन आपलं मूल दुखावलेल?
   
आणि नातवा प्रमाणे संगोपन करणाऱ्या यशदा मावशींना देखील कुठे आवडणारी होती हि गोष्ट?

पण स्वाभाविक गोष्टीला मुकलेली यशदा मावशी गौरीच्या रागिष्ट आवाजाला दचकून आतल्या आत घुटमटून गेली होती . समजूतदार असणाऱ्या गौरीने देखील जास्त काही फाफट पसारा आपल्या रागाचा  न होऊन देता,चढलेल्या रागाचा  पारा उतरवत वरदला कडेवर घेऊन निकामी भाव चेहऱ्यावर, कसलाही प्रतिसाद न देता यशदा मावशींकडे बघत हॉटेलच्या आत निघून गेली.
                .
                .
                .

वरदच हाथ सोडून आकर्षित करणाऱ्या गोष्टींकडे धाव घेणं , खोडकर पणाच्या  वृत्तीमुळे सामान वयाच्या लहान मुलांचा आपापसातील भांडण होणं, यशदा मावशींकडून वरदने दिलेल्या झटक्यामुळे  वरदचा हाथ आपल्या एका हाथातून सुटणं , घड्याळाच्या काट्यांवर चालणाऱ्या गौरीचा प्रिप्लान केलेला बर्थडे  ठरवलेल्या प्लॅन अनुसार करण, उशीर होत होता म्हणून गौरीच बाहेर येणं आणि तिच वरदकडे लक्ष जाण, सारं काही स्वाभाविक होत, वेगळा अस काहीच नव्हत.......

पण,

फरक तिला पडला होता, जिची चूक नसतानाही स्वाभाविक गोष्टींवर ,

गौरीचा रागाने एकवटलेला  उच्च स्वरातील आवाज हा यशदा मावशींनी कमावलेल्या प्रेमाचा ,विश्वासाचा, आणि इज्जतीचा निशब्द उदार मायेचा अपमान होता .













Tuesday, 16 April 2019

A meaningful silence...

गर्दीतील शांतता 


13 एप्रिल, सोलापूर जिल्ह्यामधे असणाऱ्या एका छोट्याशा गावाचा उरूस.
डोंगर फोडून वसलेल्या एका गावात हळू हळू लोकसंख्या वाढत होती. लोकांचा
सुसंवाद वाढत होता, नवनव्या संकल्पना गावात रुजू होत होत्या. गावचा उरूस ही
संकल्पना म्हणजे ग्रामदैवतेच्या पूजेचा दिवस, संपूर्ण वसलेल गाव उत्साहाने एकत्र येणे. 
आज कोंबडीच्या बांगाने उठलेल्या गावातील रहिवास्यांच्या घरी पाहुण्यांची  वर्दळ चालू आहे.
पहाटेलाच उठून ग्रामदैवतेच्या नैवेद्याची तयारी प्रत्येक घरा घरात चालू  झाली.
प्रत्येक घरात गोड पदार्थांचा वास दरवळत होता. शेजारच्या गावातून येणाऱ्या पाहुण्यांचा 
पाहुणचार आणि आवर्जून होणारी एकमेकांविषयीची विचारपूस प्रत्येक घरात चालू होती.
लहान लहान मुले नवे कपडे घालून तयार झालेली होती. वातावरण अगदी आनंदी होऊन गेल
होतं. डोक्यावरील सुर्य थोडा मावळतीच्या मार्गावर ढळण्याची चाहूल लागताच हळू हळू लोकांची
वर्दळ गावामध्ये वाहू लागली. गावच्या चौरह्यावर वसलेलं रामाचं मंदिर गावकर्‍यांनी
छान रंगीबेरंगी फुलांनी सजवलं होतं, मंदिराबाहेर नक्षीकांत रांगोळी काढली होती,
लहान लहान मुलांना आकर्षित करणार्या बर्याच प्लास्टिकच्या खेळण्यांच्या टोपल्या
उरूसामध्ये दिसत होत्या, पिपाणीचा आवाज, गडबड गोंधळ, हसण्या खिदळण्याचा आवाज,
उंच पाळण्यामध्ये बसून आपला आनंद व्यक्त करणार्‍या लोकांचा आवाज....
शेव रेवडीचा आणि पेठाचा वास देखील दरवळत होता, कपडे विक्रेते, मंदिराबाहेर हार फुलं, गजरे विक्रेत्यांचे 
गाळे, या  सर्व गोष्टींनी वातावरण  उत्साही बनून गेले होते. वर्षातला एक दिवस जिथे गाव 
आवर्जून एकत्र जमतं, "आमच्या गावचा उरूस" अभिमानाने वाखाणणे ही प्रत्येकाची ठळक 
रितीने सांगण्याचा एक  वेगळाच अभिमान असतो.
गावातील सरजामे कुटुंबातील पंधरा वर्षांची आपल्या आईचा हाथ धरून गावच्या उरूसातील  गर्दी
मधून नीटसा श्वास पण न घेता येणारी शुभांगी खेळण्याचे आवाज, लोकांची आवड, गर्दीतला धुमाकूळ बऱ्याचशा गोष्टी कुतूहलाने पाहत होती. काही अंतरा वर शुभांगी ची आई उरूसातील बांगड्या
घेण्यासाठी सभोवताली असणाऱ्या गर्दी तुन स्वतःची वाट करत थांबली.शेव रेवडी च्या गाड्या जवळ असणाऱ्या, एक फाटक गोण अंथरून बसणाऱ्या मुलाकडे शुभांगी ची नजर आपोआप खेचली जाते.
काळवंडलेल शरीर, अंगावर फाटका शर्ट, भुकेपोटी आसूसलेल मन ,अणवाणी आणि हिरमुसलेला चेहरा असा हा लगबग 21/22 वर्षाचा व्यंकट. 
व्यंकट कोण्या गावावरून चार पैश्याच्या आशेसाठी उरूसात हार- फुल विकत होता.
हलकासा पाऊस पडण्यास सुरुवात होते. पावसाचा टपोरा थेंब  त्याने माळलेल्या हार- फुला वर पडताच चार पैश्यासाठीची आशा  धाडकन  कोसळन्याची जाणीव त्याच्या डोळ्यात दिसू लागते.
माळलेल्या हार-फुला वर पडलेला टपोरा पावसाचा थेंब  टचकन डोळ्यात पाणी आणतो.
खातरी करण्यासाठी पुनः एकदा आकाशाकडे बघतो आणि हातात नसणाऱ्या गोष्टी सोडून देऊन आपलं चार पैसे कमावन्याच साधन आवरायला घेतो.
शुभांगी आपल्या अवती भवती घडणाऱ्या बऱ्याच गोष्टी पैकी ही गोष्ट डोळ्याने पाहत होती.
हा प्रकार अवघ्या दोन मिनिटांचा असावा जो तिच्या डोक्यात असंख्य प्रश्नांचा साचा करून गेला.तिच्या डोक्यात, गर्दीत असणारी पण मनाला भीडनारी गोष्टी ने मात्र हृदयात घर केल, जशी गर्दीतील शांतता....

गर्दीतील या शांततेने ती अबोल झाली.

स्तब्ध झालेल्या मुलीला कधी तिच्या आई ने घट्ट पकडलेला हाथ खेचला ते कळालच नाही.

Sunday, 14 April 2019

It will please some of you to know that I almost titled this article " असह्य उन्हात सुखवणारी मंद वाऱ्याची झुळूक " Article says, Let the hope drive our life...

   

                       असह्य उन्हात सुखवणारी  मंद वाऱ्याची झुळूक



        पायल, गरीब कुटुंबातील पण मनाने स्थिर आणि खंबीर, शांत स्वभावाची मुलगी. लहानपणा पासूनच          अभ्यासात हुशार, खेळण्या बागडन्याच्या वयात गरिबीच्या बोजाखाली दडलेल्या कुटुंबाला छोटासा हाथभार म्हणून कष्टात लहानपण घालवलेली सोज्वळ अशी मुलगी.
घरी गरिबीची परिस्थिती. वडील मोलमजुरी करून संसाराचा गाडा पुढे नेत. हाथावरचा पोट...  शेतात मोलमजुरी करणे आणि आपला उदरनिर्वाह करणे असा दिवसा मागून दिवस ढकलन्याचा एकमेव मार्ग जणू गरिबीच पाचविला पुजलेली. सावकाराच कर्ज माथ्यावर, घरात वीज नाही ना पोटभर खायला पुरेसं अन्न. असा हा संसाराचा गाडा एकटाच ओढणारा पायल चा बाप तुकोबा.
                  आयुष्यभर शंभर रुपये मोलमजुरी वर घर चालवणारा तुकोबा आज जास्त चिंतेत दिसत होता. थकलेल शरीर,थरथरनारे हाथ पण डोळ्यामध्ये असणारी एक आस जणू त्याच्या प्रत्येक श्वासाचा पुरावा होती.
 तुकोबा ची मुलगी आज पदवीधर होणार आहे. तुकोबा ने आज पहाटेलाच लवकर उठून विहिरीतून काढलेल्या पाण्याने देवाचे नामस्मरण करत अंघोळ केली. बायकोच्या हाथची पिठलं भाकरी बाहेर वाळत टाकलेल्या पांढऱ्या हाथरुमाला मध्ये बांधून घेऊन आपल्या बायकोचा हाथ हातात घेऊन म्हणला, "आज आपली लेक पदवीधर होणार आहे, खूप कष्टाने वाढवली पोर माझी"...(चेहऱ्यावर अभिमान आणि सुखाची चाहूल झळकत होती.)
तिच्या साठी गोडाचा शिरा कर .आज सावकाराला पैशाची विनंती करून पाहतो.
 गरिबीने बालपण हिरावून घेतला माझ्या लेकीचा. अंधाऱ्या खोलीत डोळे तारवटून मेणबत्ती च्या प्रकाशाखाली अभ्यास केलाय माझ्या पायल ने...(एकदम दबक्या आवाजात, डोळ्यात असावे दाटवून  येतात आणि तुकोबा शेताची वाट धरतो.) माथ्यावर असलेल्या उन्हात, पायाला चटके बसणाऱ्या काळ्या मातीत काम करणाऱ्या तुकोबाच्या माथ्यावरुन घरंगळत येणारे कष्टाच्या घामाचे ओघळ फक्त आणि फक्त एकाच आशेसाठी आतुरले होते...
तुकोबाला आपल्या पोरीला शिकवण्याचा ध्यास हा गरिबीला कमजोरी मानून शेतकऱ्याच रक्त पिळनाऱ्या सावकारा पासूनच्या बचावासाठी होता. अडाणीपणा हा पिळवनुकिच कारण बनला आणि गरिबी पाचवीला पूजली गेली. आयुष्य जगण्या लायक न राहता गुलाम गिरी लायक होऊन गेलं होत .विचारांचे भडीमार डोक्यामध्ये चालू असताना त्याच शेताच्या ठेकेदाराचा तुकोबाला आवाज ऐकू येतो...
           
ए तुकोबा..........

अरे ए तुकोबा......

 तुझ्या साठी फोन आलाय बघ तुझ्या पोरीचा. हाथी असलेला फावडा तसाच टाकून गळ्यात असणारे मळकट फडक चेहऱ्यावर फिरवत उन्हामध्ये तापलेल्या चटके बसणाऱ्या काळ्या मातीत मोठी मोठी पाऊले टाकत शेड खाली बसलेल्या ठेकेदाराकडून फोन तुकोबा घेतो, आणि तुकोबाचे आतुरलेले कान शब्द ऐकतात ...

                  बाबा,     मी पदवीधर झाले. मी पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले... 

 थरथरता हाथ, पाणवलेल्या डोळ्याच्या कडा, सुन्न पडलेल्या डोक्यात सगळं काही थांबलं होत... 
 तो क्षण जणू तुकोबा साठी, 

                     मंद वाऱ्याची झुळूक होती जी जणू असह्य उन्हाला देखील सुखवून टाकणारी होती.....

Saturday, 13 April 2019

शांतस्वभावी ...


'आभास'


काव्य...


प्रकाशमूक...


द्विधा...


खेळ भावनांचा...


मावळतीचा सूर्य...


संध्याकाळ...


अशी ती, तशी ती!


निशब्द!


Radhecha Murari