Thursday, 6 February 2020

HUMANITY





  सायमा सव्वीस वर्षाची मुलगी. प्रवास करण तिची आवड ,  मोजकी पण दर्जेदार स्वप्न घेऊन प्रवासातील रोचक असे क्षण टिपणे तिला आवडायचा.
असाच एक प्रवास तिचा परदेशातला. नवीन माणसं आणि त्यांच्या खुबी अनुभवायला तिला मिळालेली उत्तम संधी.  खूप मोठा प्रवास करून थकलेली ती सोबतची बॅग उतरवून नवीन खोली मध्ये उजव्या बाजूला भिंती लगत असणाऱ्या खुर्ची वर बसते, दमलेली ती पण उत्साही मन तिला फार काही वेळ बसून द्यायना. सायामा ने तिच्यासाठी मस्तपैकी कॉफी केली. ती कॉफी म्हणजे तिचा क्षीण घालवायचा एकमेव इलाज. कॉफीच्या पहिल्याच घोटाने तिच्या चेहऱ्यावर एक अलगद हलकीशी स्माईल आली.  ती स्माईल एकदमच प्रश्नार्थक हावभावांमध्ये वळली जसा तिने टक टक असा कोणीतरी  जिना वर चढून येताना चा आवाज ऐकला.  अस्वस्त झालेली सायमा दरवाजाकडे गेली. आणि पुन्हा तिच्या चेहऱ्यावरचा प्रश्नचिन्ह एका स्वागतारूप स्मित हास्या कडे वळलं कारण कोणीतरी एक समवयीन सुंदर मुलगी आपली बॅग घेऊन नुकतेच  जिने चढून  हुश्श असा श्वास सोडत होती. दोघींची नजरा नजर होताच सायमा ने तिला मिठी मारली आणि मारिया चे त्या खोली मध्ये स्वागत केले.  मारिया देखील प्रवास करून थकली होती, तिनेहि अवघ्या काही मिनिटामध्ये आपल्या खोलीची राहन्याची जागा वेचली होती. अगदी वरवरचा परिचय त्या दोघींना एकमेकींच्या सहवासाची ओढ देत होता. सायमा ने मारिया ला देखील कॉफी करून दिली. कॉफी घेत दोघींच्या गप्पा रंगत आल्या आणि संध्याकाळ पर्यंत चालू राहिल्या. नंतर रात्रीचे जेवण झाल्यावर सायमा झोपायला गेली पण एक प्रश्न मात्र तिला खूप भेडसावत होता  तो म्हणजे मारिया ने सायमाला विचारलेला प्रश्न.
प्रश्न अर्थात खूप नॉर्मल होता पण माणुसकी छेडणारा होता. अर्थात कोणाला आवडेन सुशिक्षित समाजाने  धर्माबद्दल विचारलेला????????
   धर्म विचारून माणसाविषयी तर्क लावणारा अनुभव मात्र सायमा ला सहन न होणारा होता. बोलाचाली मध्ये खंड न पडावा यासाठी सायमा ला त्या प्रश्नाचा सरळ उत्तर देण  भाग पडलं. उत्तर ऐकताच मात्र मारिया च्या बोलण्यामधील जाती भेदाचा चढ उतार जाणवला. शिक्षणाच्या नावाखाली दोघींना सर्व धर्म समभाव थेअरी माहिती होती मात्र प्रत्यक्षात अमलात आणण मात्र जमलं नाही. त्यानंतर चा राहण, उठणं,बसणं, सवयी या सगळ्या मात्र जाती धर्मा वरून जङज्ज होऊ लागल्या. अशी परिस्थिती प्रत्यक्षात हाथळण आणि मुख्य म्हणजे माहित असलेली थेअरी अंमलात आणण्यासाठी समोरच्या च्या मानसिकतेवर अभ्यास करण म्हणजे खरच अवघड.
   असो, जाती धर्म विचारणां पलीकडे जाऊन जाणून बुजून सायमा आणि मारिया चे दिवस हसत खेळत जात होते  पण कुठेतरी कमीपणा मात्र वाटत होता.
एके दिवशी  बेत करून  धर्माचा न चुकता भडीमार करणारी मारिया सायमा ला घेऊन त्यांच्या धर्म मंदिर मध्ये घेऊन गेली. धर्म मंदिराची लक्ख भव्यता पाहून दोघींना मात्र फोटो काढायचा मोह आवरला नाही. मोबाइलला चा कॅमेरा लगेचच सुरु झाला. एकीला फोटो खेचण्यामध्ये आनंद होता तर एकीला परफेक्ट फोटो काढण्याची एक्साइटमेंट होती. या मोहामध्ये त्या दोघीही  पूर्णपणे विसरून गेल्या होत्या कि हे प्रेक्षणीय स्थळ नसून आतापर्यंत जङज्ज करत आलेल्या धर्माच्या  बडेजावाच्या नावाखाली  निच्या दाखवणाऱ्या धर्माची पवित्र जागा आहे. त्याच वेळी मीही तिथे त्या जागेची भव्यता पाहत पाहत कोणा धार्मिक लोकांसमवेत तिथे पोहोचले आणि अचानक थांबले, मीच नवे तर माझ्या सोबतचे इतर काही लोक देखील. आम्ही सर्व जण मारियाचा फोटो क्लिक होईपर्यंत काही सेकंड्स  गाभार्यापर्यंत  जायचे थांबलो कारण त्या दोघींचा त्या मोमेंट चा आनंद सगळ्यांना खिळवून टाकणारा होता.
   कदाचित त्यांना जाती धर्माच्या पलीकडे नेऊन ठेवणारा सायमा आणि मारियाचा मनमुराद आनंद  हवाहवासा वाटत होता. सायमा कडून मारियाचा फोटो क्लिक होताच पुन्हा त्या पवित्र जागेवरील इन्फिनिटी पॉवर ला भेटायची वर्दळ चालू झाली.   तेव्हा एक प्रॅक्टिकल कन्सेप्ट छेडली गेली.


"Humanity becomes priority than religion when people more concern about activities which touch their soul and hit their mind."